Tuesday, October 21

शब्दानी कसे सांग तुला मी सजवू
शब्दात कसे या तुला मी वर्णू ....
शब्दाना काय ठाव भाव अंतरीचे
शब्दाना कसे सांग
गुज मनीचे सांगू ......

शब्दानी ज्या हुरहुर कधी न भोगली..
शब्दाना त्या तुझी आठवण कशी समजवू ....
शब्दानी ज्या
कधी पाहिले तुला...
शब्दाना त्या
सौंदर्य सांग कसे दाखवू ....

शब्दानी ज्या नुसत्या जोडल्या ओळी ...
शब्दाना त्या
गीत प्रितीचे कसे ऐकवू ....
शब्दानी ज्या ठोकले दावे स्पष्टीकरणाचे..
शब्दाना त्या
प्रेम सांग कसे समजवू .....

शब्द जे नेहमी फिरले एकट्याने ..
शब्दाना त्या
मिलनाची गोडी कशी समजवू ..
शब्दानी ज्या फक्त मोजली अंतरे ..
शब्दाना त्या
साथ तुझी सांग कशी दाखवू ...

शब्दांचेच हे प्रश्न सगळे ....
शब्दांचीच ही त्याला सगळी उत्तरे ...
शब्दाना या सांग वेड्या ...
शब्दाच्या पलीकडले सगळे कसे सांगू ...

शब्दानी कसे सांग तुला सजवू
शब्दात कसे या तुला मी वर्णू ....

.......निनाद (13/10/2008)

2 comments:

Pranav said...

chhan

Ameya Datar said...

sahich re... class... 2nd aani 3rd kadavi sagalyat vyavasthit basali aahet...aani overall sankalpana aani mandani chanach aahe... liked it.. Keep it up!